नगावे हे गाव पालघर तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे २० कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण लागवडी योग्य क्षेत्रफळ १६०.८८.४ हे . आर असून ग्रामपंचायतीमध्ये ३ वार्ड आहेत. एकूण ४४८ कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या ११८४ आहे. त्यामध्ये ५९१ पुरुष व ५९३ महिला यांचा समावेश होतो.
गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने सपाट प्रदेशात असून तेथील शेतीयोग्य जमीन कमी प्रमाणात आहे. अवघ्या ७ किमी अंतरावर सफाळे रेल्वेस्टेशन आहे. उन्हाळ्यात तापमान साधारणतः ३१°से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात २९°से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी ६० ते ७० से.मी. पर्जन्यवृष्टी होते.
लोकजीवन
नगावे गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय नसल्याने लोक बाहेर गावी मोठ्या प्रमाणावर कामावर जातात.
गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा साप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे.
येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
आंबोली च्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.